Posts

भगवान गौतम बुद्धाच्या पुतळ्याची अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना

Image
भद्रावती प्रतिनिधी ( शिरीष उगे) :- शहरातील ऐतिहासिक बुद्ध लेणी टेकडीवरील भगवान गौतम बुद्धाच्या पुतळ्याची अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना झाल्याची घटना दिनांक एक रोज सोमवारला पहाटेच्या वेळी उघडकीस आली. सदर घटनेनी संतप्त झालेल्या शहरातील बौद्ध बांधवांनी मोर्चा काढून या घटनेचा निषेध व्यक्त करीत या अज्ञात समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत भद्रावती येथील तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले आहे. सदर ऐतिहासिक बौद्ध लेणी टेकडीवर भगवान बुद्धाचा पुतळा होता. टेकडीवर हा पुतळा असल्याने तो सहजपणे दिसायचा. घटनेच्या दिवशी या परिसरात पहाटे फिरणाऱ्या काही व्यक्तींना हा पुतळा न दिसल्याने त्यांनी टेकडीवर जाऊन पाहणी केली असता पुतळ्याची तोडफोड झाल्याची आढळून आले. घटनेची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहरातील बौद्ध बांधव सुद्धा घटनास्थळी जमा झाले.त्यानंतर नाग मंदिरापासून निषेध मोर्चा काढून शहरातील व्यापाऱ्यांना भद्रावती बंदचे आवाहन केले केले. त्याला प्रतिसाद देत शहरातील व्यापारी प्रतिष्ठाणे बंद ठेवण्यात आली. त्यानंतर बौद्ध बांध...

इको-प्रो तर्फे पक्षीनिरीक्षण तथा जनजागृती कार्यक्रम

Image
शिरीष उगे (तालुका प्रतिनिधी) भद्रावती : पद्मभूषण डॉ सलीम अली तसेच सेवानिवृत्त वनाधिकारी श्री मारुती चितमपल्ली यांनी पक्षी संवर्धनाकरिता केलेल्या अमूल्य कार्याची दखल म्हणून यांच्या जन्मदिनाचे औचित्त साधून दिनांक ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. त्याच निम्मिताने इको -प्रो भद्रावती तर्फे पक्षी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या दरम्यान शहरालगत व तालुक्यात असलेल्या काही पानवठ्यांवार पक्षी निरीक्षण व जनजागृती करण्यात येणार आहे. यामध्ये दि.५ नोव्हे. लाघोडपेठ तलाव, दि.६ नोव्हे. ला दुधाळा व लेंडारा तलाव, दि.७ नोव्हे. ला चिंतामणी तलाव, दि.८ नोव्हे. ला मल्हारा तलाव, दि.९ नोव्हे ला विंजासन तलाव,दि.१० नोव्हे. ला घोट-निंबाळा तलाव, दि.११ नोव्हे. ला डोलारा तलाव तसेच दि.१२ नोव्हे ला गौराळा तलाव या तलावांवर दररोज सकाळी ६ ते ८.३० या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यात पक्षीनिरिक्षणा सोबतच पक्षांचे निसर्गात असणारे महत्व, संकटग्रस्त पक्षी आणि त्यांचे अधिवास संवर्धन, स्थलांतरित पक्ष्यांच्या अधिवासाचे संरक्षण या सोबतच पक्षीसंरक्षण व संवर्धन कायद्या विष...

आनंदवनात जागतिक दिव्यांग दिन साजरा

Image
शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी)       :म.से.स.वरोरा, आनंदवन द्वारा संचालित आनंद अंध विद्यालय, आनंद मूकबधिर विद्यालय आणि संधिनिकेतन अपंगांची कर्मशाळा यांनी संयुक्तपणे जागतिक दिव्यांग दिवस साजरा केला. या कार्यक्रमाचे आयोजन दोन टप्प्यांत करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात  ठरल्याप्रमाणे  ठीक 9:30 वा. पाहुण्याच्या प्रमुख उपस्थितीत निजबल इमारतीच्या आवारात दीप प्रज्वलन करण्यात आले. श्रद्धेय बाबा आमटे व साधनाताई तसेच दिव्यांगजनांना प्रेरणादायी असणारे व्यक्तिमत्व डाॅ.हेलन केलर व लुईस ब्रेल यांच्या प्रतिमांना माल्यार्पण केल्यानंतर अतिथींचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी संधिनिकेतन अपंगांची कर्मशाळाचे अधिक्षक मा. नलगिंटवार सर यांनी प्रास्ताविक भाषण केले तर आनंद मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. भसारकर सर यांनी जागतिक अपंग दिनाचा इतिहास, अपंग विद्यार्थी व अपंगाच्या शाळांपुढील  आव्हाने यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे विश्वस्त मा. सुधाकर कडू सर यांनी भूषविले. अतिथी म्हणून म.से.स.चे ज्येष्ठ कार्यकर्ता कविश्वरकाका तसेच ग्रामपंचायत आनंदवनचे सरपंच मा.सॊ.रुपालीताई दरेकर व उपस...